फलटण प्रतिनिधी :
विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिले जाणारे जिल्हा स्तरीय आई सन्मान पुरस्कार २०२३ ची घोषणा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश तांबे यांनी नुकतीच केली. यावर्षी प्रथमच दिला जाणारा जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार फलटण येथील दैनिक ग्रामोद्धारचे फलटण तालुका प्रतिनिधी शक्ती उर्फ अशोक मनोज भोसले यांना जाहीर झाला आहे. विविध विभागातील दिले जाणारे पुरस्कार पुढील प्रमाणे
1) शक्ती उर्फ अशोक मनोज भोसले, पत्रकार 2) अतुल जगन्नाथ कुंभार, पोलीस 3) कु. अक्षता आबासाहेब ढेकळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू 4) श्रीमती कोमल ज्ञानेश्वर जाधव, आरोग्यसेविका, 5 ) सौ. चित्रा मोहन इंदापुरे, अंगणवाडी सेविका 6) गणेश अशोक शिंदे, सातारा 7) बिरा आप्पा लोखंडे, माण 8) किरण श्रावण अहिवळे, खटाव 9) विजयकुमार किसन भुजबळ, कोरेगाव 10)सौ.रुपाली रामदास जाधव, वाई 11) सौ.सुजाता बाळासाहेब सोळस्कर, खंडाळा 12) राजेंद्र तात्याबा गोफणे, महाबळेश्वर 13) दत्तात्रय सोमनाथ भोसले, कराड 14) विनायक आप्पासाहेब चव्हाण, पाटण,१५ )सौ. सिमा सुरेश पार्टे ,जावली, 16) सौ. सुरेखा शिवाजीराव निंबाळकर, जिल्हा प्राथमिक शाळा सांगवी 17) कृष्णाथ बारीकराव कुंभार, जि.प.प्राथ. शाळा वाठार निंबाळकर 18) दत्तात्रय किसन पवार, जि.प.प्राथ. शाळा वाघोशी 19) सौ. कांचन अमोल चवरे, संचालिका जाई एज्युकेशन सोसायटी, जावली 20) सचिन जगन्नाथ घुमाळ, मुधोजी हायस्कूल, फलटण 21) अनुराधा रमेशराव कदम, जिल्हा परिषद शाळा फरांदवाडी 22) सचिन कालिदास पंडित, जि. प. शाळा काळज,23) नवनाथ चंद्रकांत कोळपे, जिल्हा प्राथमिक शाळा कुसूर २४) सौ. उज्वला सुरेश नाळे, जि. प.शाळा बागेवाडी २५) कु. निलेश हिम्मतराव निंबाळकर, श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण. 26) सौ.निलम अर्जुन रुपनवार, जि. प. शाळा सस्तेवाडी, 27) सुनील विजय तिवटाणे, जि. प. शाळा बोडकेवाडी, 28) सागर बाळासाहेब लोंढे, जि. प. शाळा जि. प. शाळा मिरढे, 29) यशवंत रमेश जगताप, जि. प. शाळा वाजेगाव आदी मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. लवकरच हे पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
जिल्हस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शक्ती भोसले यांचे अभिनंदन केले आहे.