सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन जिल्हा बँकेच्या उज्ज्वल परंपरेची घोडदौड कायम ठेवून बँक यशाच्या उच्च शिखरावर नेण्याची ग्वाही नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी यावेळी दिली.
कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन जिल्हा बँकेच्या उज्ज्वल परंपरेची घोडदौड कायम ठेवून बँक यशाच्या उच्च शिखरावर नेण्याची ग्वाही नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी यावेळी दिली.
येथील प्रीतिसंगमावरील आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस बुधवारी ८ रोजी सकाळी जिल्हा बँकेचे नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार बटाणे, सादिक इनामदार तसेच बँकेच संचालक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
चेअरमन नितीन पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, किसनवीर आबा, तत्कालीन ज्येष्ठ नेते या सर्वांच्या विचाराने जिल्हा बँकेची स्थापना झाली. त्यांनी बँकेला एक परंपरा स्थापन करून दिली. एक नावलौकिक मिळवून दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी आमच्या विश्वास ठेवून आमची बिनविरोध निवड केली. या विश्वासाला पात्र राहून यापुढे बँकेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही दोघे कटिबध्द आहोत.
व्हाईस चेअरमन अनिल देसाई म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी बँकेची स्थापना केली असून त्यांच्या विचारांचा वारसा यापुढे कायम ठेवण्यासाठी त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत आहोत. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी बँकेला तरूण अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध निवडून दिलेत. देशामध्ये एक नंबरच म्हणून बँकेचा लौकिक आहे. हा लौकिक कायम ठेवून बँक उच्च शिखरावर नेण्याचे काम करणार असल्याचा विश्वास शेतकरी, सभासदांना देतोय, असेही त्यांनी यावेळी सांगितले.