संशयीत रवि कुडवे याचा दाजी नितीन नागेश भालशंकर (वय २१) रा. वैराग, सध्या रा. वाखाण परिसर, कराड हा त्याच्या पत्नीला व रविच्या बहिणीला दारु पिवून वारंवार मारहाण करत होता. त्याबाबत रवि त्याला समजावून सांगत असताना दोघांत वाद झाला. या वादात रविने गळा दाबून दाजी नितीनला बेशुध्द केले व त्यानंतर शेजारचा दगड उचलून त्याच्या छातीवर मारला.
कराड : येथील वाखाण परिसरात बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून मेव्हण्यानेच त्याच्या दाजीचा गळा दाबून व छातीवर दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दाजीचा खून करणाऱ्या मेव्हण्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रवि रमेश कुडवे (वय २३, मूळ रा. वैराग, ता. बार्शी सध्या रा. वाखाण परिसर, कराड) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, संशयीत रवि कुडवे याचा दाजी नितीन नागेश भालशंकर (वय २१) रा. वैराग, सध्या रा. वाखाण परिसर, कराड हा त्याच्या पत्नीला व रविच्या बहिणीला दारु पिवून वारंवार मारहाण करत होता. त्याबाबत रवि त्याला समजावून सांगत असताना दोघांत वाद झाला. या वादात रविने गळा दाबून दाजी नितीनला बेशुध्द केले व त्यानंतर शेजारचा दगड उचलून त्याच्या छातीवर मारला. त्यामध्ये नितीन ठार झाला. या गुन्ह्यात कराड शहर पोलिसांनी रवि कुडवे यास अटक केली होती. पोलिसांनी त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जून चोरगे करत आहेत.