फलटण प्रतिनिधी : विकासात्मक कामाकरिता अहोरात्र झपाटलेले नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे पाहिले जाते. पुणे जिल्यासह महाराष्ट्रातील विकास कामांमध्ये अजित दादा यांचे मोलाचे योगदान आहे. काल फलटण येथे संवाद यात्रेदरम्यान जाहीर सभेत बोलत असताना एकूणच महाराष्ट्राच्या विकासाचा आढावा घेतला. दरम्यान फलटण मतदार संघामध्ये किती कोटींच्या निधीची कामे झाली हा प्रश्न भरसभेत आमदार दिपक चव्हाण यांना विचारला. यावर दिपक चव्हाण यांनी चुकीचे उत्तर दिल्याने, लागलीच काय थापा मारतंय असे अजित पवार बोलून गेले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थापाड्या आमदार दिपक चव्हाण असे नामकरण केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. याच विषयावरून दिपक चव्हाण यांना सोशल मीडियावरही ट्रोल केले जाऊ लागले आहे.