फलटण प्रतिनिधि -
२५५ फलटण - कोरेगांव(अ.जा.) विधानसभा मतदार संघातून संविधान समर्थन समितीच्या वतीने बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी याकरिता विविध पक्षांना भेटून उमेदवारीची मागणी केली होती. जवळपास सर्वच पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रस्थापित पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी पासून वंचित ठेवले. अखेर संविधान समर्थन समितीच्या वतीने बौद्ध समाजातील अपक्ष उमेदवारीची घोषणा करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा. रमेश आढाव यांच्या उमेदवारीची घोषणा पत्रकार परिषदेत संविधान समर्थन समिती व परिवर्तन महाशक्ती विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते विजय येवले, प्रा. रमेश आढाव, बी. टी. जगताप, मा. नगरसेवक सचिन अहिवळे, मा. नगरसेविका सौ वैशाली सुधीर अहिवळे, सौ. सुपर्णा सनी अहिवळे,सुधीर अहिवळे, गंगाराम रणदिवे, ॲड. आकाश आढाव, आदी मान्यवर उपस्थित होते.
२५५ फलटण - कोरेगांव हा २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या राखीव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजातील घटकाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याची समाजात खंत निर्माण झाल्याने व आपणास डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी " एकच निर्धार ...बौद्ध आमदार ' अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले आहे होते.
या संवाद अभियानास फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर बौद्ध समाजातील बांधवांची राजकीय मोठ बांधण्यासाठी फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाचे आयोजन केले होते.
खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना भेटून बौद्ध समाजाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळावे याकरिता निवेदन देत मागणी केली होती. मात्र वरील पैकी कोणत्याही नेत्याने बौद्ध समाजाच्या मागणीचा सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे अखेर संविधान समर्धन समितीच्या वतीने नंदु मोरे, बुवासाहेब हुंबरे, गंगाराम रणदिवे व प्रा. रमेश आढाव यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नंदु मोरे, बुवासाहेब हुंबरे, गंगाराम रणदिवे यांनी उमेदवारी माघारी घेतले आहेत. त्यामुळे संविधान समर्थन समिती व परिवर्तन महाशक्ती विकास आघाडीचा वतीने प्रा. रमेश आढाव यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.