फलटण प्रतिनिधी -
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सातारा जिल्हयात राजधानी महासंस्कृती महोत्सव अंतर्गत फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि फलटण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे सौरभ कर्डे यांचे शिवव्याख्यान होणार आहे.
यावेळी फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव ,गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नगर परिषदचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.तसेच इ.१ ली ते ५ वी माझी वसुंधरा स्वच्छता व पर्यावरण, इ.६ वी ते ८ वी शिवचरित्र /छत्रपती शिवाजी महाराज जीवन प्रसंग,इ.९ वी ते १० वी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा/लोकधारा,इ.११ वी ते १२ वी लोकशाही निवडणूक मतदार जागृती या विषयावर आयोजित केलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तरी फलटण तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.