फलटण प्रतिनिधी:
९ ऑगस्ट क्रांती दिवस भारतीय स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या व शहीद झालेल्या वीर स्वातंत्र्य सेनानी यांना अभिवादन करण्यासाठी फलटण येथील नागेश्वर मंदिर चौक येथे असणाऱ्या हुतात्मा स्तंभला रिपाई आठवले गट व फलटण भाजपा यांनी अभिवादन केले नेहमी गजबलेला असणारा व मुख्य बाजारपेठेत हातगाडी विक्रेत्यांच्या गर्दीत हा स्मृती स्तंभ एरवी झाकोळलेला असतो परंतू काल क्रांती दिनी या ठिकाणची स्वच्छता करत स्तंभास रंगरंगोटी करण्यात आली होती
अभिवादन 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला वंदन करताना नगरसेवक अशोकराव जाधव, जयकुमार शिंदे, अमोल सस्ते, सचिन कांबळे पाटील, राहुल शहा, बाळासाहेब काशीद, संदीप नेवसे, संजय गायकवाड, नितीन वाघ तसेच रिपाई आठवले गटाचे जिल्हा सेक्रेटरी मुन्ना शेख, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारूडा, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय निकाळजे, सचिव फलटण तालुका परवीन शेळके या सर्वांनी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन केले.