सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार उदयनराजें भोसले यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता पार पडला.
सातारा : सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार उदयनराजें भोसले यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता पार पडला. केवळ सन्मानपत्र देवून पालिका शिक्षक आणि पालिका शाळांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळय़ाला खासदार उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, बाळासाहेब ढेकणे, सामाजिक कार्यकर्ते राम हादगे, ज्येष्ठ पत्रकार हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार उदयनराजेंच्या हस्ते 2019-20 चे पालिका शाळा क्रमांक 2 च्या सौ. संगीता आखाडे, शाळा क्रमांक 15 च्या सौ. माधुरी खुर्द, शाळा क्रमांक 6 च्या सौ. लता घनवट, पालिका शाळा क्रमांक 14 च्या सौ. संगीता दिरांगणे, 2020-21 चे शाळा क्रमांक 8 च्या सौ. जयश्री जाधव, शाळा क्रमांक 12 च्या श्रीमती नफिसा महापुळे, शाळा क्रमांक 23 च्या सौ. संगीता मोरे, पालिका शाळा क्र.17च्या सौ. योजना धर्माधिकारी, 2021-22चा शाळा क्रमांक 19 चे नंदकिशोर वाघमारे, शाळा क्रमांक 10 च्या सौ. सुमैय्या महापुळे, शाळा क्रमांक 16 च्या सौ. वंदना तावरे, शाळा क्रमांक 13 चे आसिफ उस्मान मुजावर, पालिका शाळा क्रमांक 23 च्या शीतल हरीष पाटणे, तर शहरातील खाजगी शाळा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोळा 2019-20 मधील नुतन मराठी महिला मंडळाचे सौ. शुभांगी कुलकर्णी, रा.ब. काळे प्राथमिक शाळेच्या सौ. माधुरी भोईटे, नवीन मराठी शाळा खडेश्वरच्या सौ. स्वप्ना महामुने, अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालयाच्या सौ. ज्योती कुलकर्णी, 2020-21 च्या नवीन मराठी शाळेच्या सौ. मनिषा मोरे, अण्णासाहेब कल्याणीचे रणजित भोईटे, बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळा देशमुख कॉलनीचे सुनील बुधावले, 2021-22चे जय जवान प्राथमिक स्कूल चेतन साबळे, आदर्श विद्या मंदिर करंजे पेठच्या सौ. नूतन रणबागले, बापूसाहेब चिपळूणकर शाळेचे बाळू शिंदे, नवीन मराठी शाळा सोमवार पेठेच्या सौ. सीमा घाटगे यांना सन्मानित करण्यात आले. तर आदर्श पालिका शाळा म्हणून 2019-20 चा पालिका शाळा क्रमांक 1, पालिका शाळा क्रमांक 6, 2020-21 चा पालिका शाळा क्रमांक 15, पालिका शाळा क्रमांक 16, 2021-22 चा पालिका शाळा क्रमांक 19 आणि 23 या शाळांचा सन्मान करण्यात आला.