फलटण प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढ दिवसानिमित्त मंगळवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून फलटण तालुक्यातील तमाम जनता, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार-संघांमध्येही त्याप्रमाणे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वसामान्य जनतेला रक्ताची गरज असते. त्यावेळी रक्त वेळेवर मिळत नाही. रक्तपेढीमध्ये रक्त उपलब्ध नसते. म्हणून अशी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यामुळे या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.