फलटण प्रतिनिधि -
२५५ - फलटण - कोरेगाव ( अनुसूचित - जाती ) विधानसभा मतदार संघातून सचिन जालंदर भिसे (मातंग समाज ) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आज झालेल्या विधानसभा मतदारसंघासंबंधी यादीमध्ये भिसे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.
२५५ - फलटण - कोरेगाव ( अनुसूचित - जाती ) विधानसभा मतदार संघातून गेली 15 वर्ष म्हणजे तीन टर्म प्रस्थापित पक्षांनी मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणूकीत मातंग समाजाला उमेदवारी मिळावी याकरिता समाजाचे वतीने आंदोलन करण्यात आले होते. प्रस्थापित पक्षांना समाजाच्या वतीने निवेदन देऊन मातंग समाजाला प्रतिनिधीत्व मिळावी याकरिता मागणी करण्यात आली होती. मात्र मातंग समाजाच्या मतांचे राजकारण करणाऱ्या एकाही प्रस्थापित पक्षाने समाजाला उमेदवारी दिली नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मातंग समाजाला उमेदवार देऊन समाजाची मागणी पूर्ण केली आहे.