फलटण प्रतिनीधी:- फलटण शहर व तालुका भाजप यांच्यावतीने चायनिज मांजा विक्री करणाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अन्यथा फलटण शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू असे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून चायनिज मांजामुळे अनेक बरेच अपघात झाले असून अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे तरीही काही विक्रिते चायनिज मांजा विक्री करत आहेत. जे कोण चायनिज मांजा विक्री करतील अशा व्यक्तीच्या विरोधात कडक करवाई करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी फलटण शहर व तालुका सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह फलटण शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात काढू असे निवेदन फलटण शहर व तालुका भाजप यांच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना देण्यात आले आहे.