बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर व फलटण एज्युकेशन सोसायटी आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा दिनांक 16/12/2023 रोजी आयोजित केलेली आहे. तरी या स्पर्धेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नावे 14 डिसेंबर 2023 पूर्वी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखा फलटण यांच्या कडे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश मोफत राहणार आहे.
ही स्पर्धा आपण चार गटांमध्ये घेणार आहोत व प्रत्येक गटामध्ये तीन बक्षीस व दहा उत्तेजनार्थ बक्षीस देणार आहोत.
सदरचे गट व त्यांचे चित्रकलेचे विषय खालील प्रमाणे:
गट 1- इयत्ता १ ली व २ री विषय - मोबाईल कव्हर डिझाईन
तुम्हाला दिलेल्या कागदावर दिलेल्या जागेत मोबाईल कव्हरसाठी बाह्याकार काढून त्यात तुमच्या कल्पकतेने कार्टून कॅरॅक्टर निर्मित करून रंगवा.
गट 2 - इयत्ता ३ री व ४थी विषय - मोबाईल फोन डिझाईन
तुम्हाला दिलेल्या कागदावर दिलेल्या जागेत मोबाईल फोनसाठी बाह्याकार काढून त्यात तुमच्या कल्पकतेने डेकोरेट करा.
गट 3 - इयत्ता ५ वी ते ७ वी
विषय - मोबाईल पुर्वीचे जग
आताच्या जगात मोबाईलला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे . परंतु पुर्वी जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा जग कसे चालत असेल हे तुमच्या कल्पकतेने चित्र रेखाटून योग्य पद्धतीने रंगवा. तसेच या विषयाला अनुसरून दिलेल्या जागेत चार ओळीत तुमचे मत लिहा.
गट 4 - इयत्ता ८वी ते १०वी
विषय - मोबाईल : शाप की वरदान
वरील विषयास अनुसरून तुम्हास दिलेल्या जागेत सांकेतिक चित्र किंवा पोस्टर किंवा कल्पनाचित्र तयार करून योग्य पद्धतीने रंगवा. तसेच दिलेल्या जागेत याबद्दलचे तुमचे मत लिहा.अधिक माहितीसाठी किरण दंडिले, 9422039976 चेअरमन, किंवा स्विकार मेहता 9730300303, यांच्याशी संपर्क साधावा.