पुसेसावळी, ता. खटाव गावच्या हद्दीत दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
खटाव : पुसेसावळी, ता. खटाव गावच्या हद्दीत दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ सप्टेंबर रोजी पुसेसावळी, ता. खटाव गावच्या हद्दीत दुचाकीवरून पडल्याने विजय सुरेंद्र तडाके, रा. पळशी, ता. खटाव हे जखमी झाले होते त्यांच्यावर कराड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खबर रुग्णालयाचे क्लार्क देसाई यांनी औंध पोलिस ठाण्यात दिली.