फलटण प्रतिनिधी -
तब्बल पाच वर्ष ग्रामपंचायतीला घराकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी करूनही रस्ता न मिळाल्याने निराश होऊन पिंपरद ता. फलटण येथील निरज कांतीलाल मोरे यांनी अखेर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पासून निरज मोरे फलटण पंचायत समिती फलटण कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, माझ्या घरासाठी गावठाणच्या जागेमधून रस्ता मिळावा यासाठी तोंडी व लेखी मागणी ग्रामपंचायतीकडे गेली पाच वर्ष मागणी केली आहे. जाण्या-येण्याच्या गावठाणच्या जागेवरती गावातीलच दिलीप जालिंदर मोरे यांनी अतिक्रमण केलेले असून ते करु नये म्हणून ग्रामपंचायत पिंपरद यांनी दिलीप जालिंदर मोरे यांना नोटीस देवून सुध्दा त्यांनी रस्त्यावरती अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मला व माझ्या कुटूंबाला जाण्या-येण्याचा रस्ता पुर्णपणे बंद झाला असून तो तात्काळ चालू करुन देणेत यावा अशी मागणी लेखी व तोंडी करूनही रस्ता मिळाला नाही. त्यामुळे सोमवार दि. 30 ऑक्टोबर पासून पंचायत समिती, फलटण या कार्यालयासमोर निरज मोरे आमरण उपोषणास बसणार आहेत.