फलटण प्रतिनिधी : 4 नोव्हेंबर 1985 रोजी मोठ्या उत्साहात पॅंथर नेते सामाजिक कल्याण केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या शुभ हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लाटकर व्यासपीठ फलटण येथे भारतीय दलित पॅंथर शाखेचे ते उद्घाटन झाले होते याच घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय दलित पॅंथर फलटण शाखेचा 38 वा वर्धापण दिन फलटण येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन फलटण येथे बुद्ध पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुकर काकडे माजी नगरसेवक व संघटक पश्चिम महाराष्ट्र आरपीआय , विजय येवले जिल्हा सचिव आरपीआय, दत्ता अहिवळे माजी नगरसेवक, राजू मारुडा जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय, संजय निकाळजे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका आरपीआय, दिपक अहिवळे सचिव फलटण तालुका आरपीआय, मारुती मोहिते तालुका सदस्य, लक्ष्मण अहिवळे अध्यक्ष फलटण शहर आरपीआय, तेजस काकडे उपाध्यक्ष फलटण शहर आरपीआय, कैलास रणदिवे चंद्रकांत मोहिते, बापू नामदास, विमलताई काकडे अध्यक्ष फलटण तालुका महिला आघाडी, राखी कांबळे फलटण शहराध्यक्ष, अलका बनसोडे उपाध्यक्ष तालुका, ज्योती अहिवळे, सारिका अहिवळे, माया अहिवळे, जयश्री अहिवळे, आशा काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मधुकर काकडे, दत्ता अहिवळे, विजय येवले, संजय निकाळजे, तेजस काकडे आदींनी समायोजित भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत मोहिते यांनी मानले.
सुरुवातीला फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फलटण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात येथे फळे वाटप करण्यात आली.