दोन परदेशी भामट्यांनी बनावट एटीएम कार्डद्वारे लोकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच त्यांनी मलकापूरसह कोल्हापुरातही बनावट एटीएमद्वारे पैसे काढल्याची कबुली त्यांनी दिली होती. आता या परदेशी भामट्यांनी तब्बल वीस बँकांची बनावट कार्ड बनविली असल्याची माहिती पोलीस तपासातून उघडकीस आली आहे. तसेच त्यांच्याकडील पासपोर्टही बोगस असल्याचे आढळून आले आहे.
कराड : दोन परदेशी भामट्यांनी बनावट एटीएम कार्डद्वारे लोकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच त्यांनी मलकापूरसह कोल्हापुरातही बनावट एटीएमद्वारे पैसे काढल्याची कबुली त्यांनी दिली होती. आता या परदेशी भामट्यांनी तब्बल वीस बँकांची बनावट कार्ड बनविली असल्याची माहिती पोलीस तपासातून उघडकीस आली आहे. तसेच त्यांच्याकडील पासपोर्टही बोगस असल्याचे आढळून आले आहे.
इ स्फॅन लुस्टीन जुओर्गल (वय २९) व लुनेट व्हसइल गॅबरिअल (वय २८, दोघे रा. रूमानीया) अशी आरोपींची नावे आहेत.
इ स्फॅन लुस्टीन जुओर्गल व लुनेट व्हसइल गॅबरिअल या दोन परदेशी युवकांनी मलकापुर, ता. कराड येथील एका एटीएम सेंटरमध्ये वेगवेगळ्या कार्डच्या माध्यमातून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असताना रविवारी सायंकाळी कराड शहर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना ७५ बनावट एटीएम कार्ड आढळून आली आहेत. त्यापैकी ७१ कार्ड अॅक्टिव्ह असून त्यावर ३५ लाख रक्कम असल्याचेही तपासातून उघड झाले आहे. मात्र, ते ३५ लाख कोणत्या खात्यावरुन त्यांनी वर्ग करुन घेतले आहेत, तसेच त्या रकमेचा मुळ मालक कोण, हे शोधताना पोलिसांना अनेक तांत्रीक अडचणी येत आहेत.
त्यातच आरोपींनी बनविलेली ७५ बनावट एटीएम कार्ड वीस राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांची असल्याचेही समोर आले आहे. आत्तापर्यंत त्यांनी त्याचा वापर करुन काढलेल्या रकमेचाही पोलिसांना हिशोब लावता आलेला नाही. तसेच त्यांच्याकडे असलेला पासपोर्टही बोगस आहे. कोल्हापुरात लॉजवर वास्तव्यास राहताना त्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्टची झेरॉक्स प्रत दिलेली होती. पोलिसांनी ती तपासली असता पासपोर्ट दक्षिण आफ्रीकेच्या रहिवासाचा असल्याचे समोर आले. या दोघांनी आत्तापर्यंत काढलेली रक्कम, त्यांच्याकडील एटीएम कार्डवर असलेली रक्कम नेमकी कुणाची, याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याचबरोबर या परदेशी भामट्यांनी केलेल्या आणखी फसवणुकीचे प्रकारही समोर येण्याची शक्यता आहे.