फलटण प्रतिनिधी :
जेष्ठ साहित्यिक, विचारवंत, इतिहास संशोधक प्रा. हरी नरके यांचे 9 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यानिमित्ताने आज गुरुवार दि. 10 ऑगस्ट, 2023 सायं. 6:00 वा. क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक ता. फलटण जि सातारा याठिकाणी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जेष्ठ साहित्यिक, विचारवंत, इतिहास संशोधक प्रा. हरी नरके हे परखड आणि अभ्यासपूर्ण भूमिका घेऊन परिवर्तनाच्या चळवळीला दिशादिग्दर्शन करणारा, समतेच्या लढाईतील एक कणखर संवेदनशील माणूस काळाच्या पडद्याआड गेला. एखादा विद्वान व्यक्ती घडणे आणि त्या व्यक्तीने पुरोगामी विचारधारेशी निष्ठा ठेवणे, ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट असते. प्रा. हरी नरके सरांनी प्रचंड व्यासंग केला. ते उत्तम वक्ते होते. मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात ते नेहमी बोलत, लिहित राहिले. असे लोक समाजात असणे म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार जपणारी निष्ठा असणे असते. समतेच्या लढाईतील एक योध्दा आज कोसळला. त्यांचे कोल्हापर आणि कोल्हापुरातील विविध परिवर्तनवादी चळवळीशी खूप जवळचे नाते होते. निर्मिती प्रकाशन, निर्मिती विचारमंच यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही ते अनेक वेळा सहभागी झाले होते. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर आयोजित व्याख्यानमालेत ही ते अनेक वेळा वक्ते म्हणून सहभागी झाले होते.
प्रा. हरी नरके यांना आदरांजली वाहण्यासाठी आज उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.