फलटण प्रतिनिधी - फलटण नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षक पदी मुकेश विनायक अहिवळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
कारड येथे स्वच्छता निरीक्षक म्हणून मुकेश अहिवळे यांनी सेवा बजावली असून त्यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारतर्फे प्रतिवर्षी राबवण्यात येणार्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला होता. नुकतेच दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते त्यावेळी नगरविकासमंत्री माधुरी मिसाळ, कराड पालिका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
मूळचे फलटण येथील मुकेश अहिवळे यांनी फलटण नगर परिषदेमधूनच आपल्या सेवेला सुरुवात केली होती. मात्र मात्र सेवाबडती मध्ये ते कराड येथे स्वच्छता निरीक्षण म्हणून रुजू झाले होते. पुन्हा विशेष बदली म्हणून ते फलटण येथे स्वच्छता निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत.