फलटण प्रतिनिधी -
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नुकताच काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या पालखी सोहळ्याचा मुक्काम तसेच पालखी सोहळ्या दरम्यान येणाऱ्या गावातील ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली यांचा सन्मान पंढरपूर (जि. सोलापूर) येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये फलटण तालुक्यातील विडणी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे यांना सातारा जिल्ह्या परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विडणी ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग तसेच विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.