फलटण प्रतिनीधी:- पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी फलटण पत्रकार संघाच्या वतीने 'पत्रकार संरक्षण कायद्याची होळी' करून उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्ले होत असल्याने त्या निषेधार्थ फलटण मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आज दि. १७ ऑगस्ट तहसील कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन निदर्शने केली.
नुकतेच पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड करण्यात आला. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात ४६ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. यामुळेच पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन जे या कायद्याचा भंग करतील त्यावर कठोर कारवाई करावी याकरिता उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषद फलटण चे अध्यक्ष प्रा.रमेश आढाव, जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय माळवे, सुभाष भांबुरे, सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी सदस्य शक्ती भोसले, सचिव विक्रम चोरमले,संघटक विजय भिसे, पोपट मिंड,बाळासाहेब ननावरे, सतीश जंगम, समीर पठाण, सतीश कर्वे, दादासाहेब चोरमले, सागर चव्हाण, विशाल शहा, रोहित अहिवळे, विकास अहिवळे, प्रसन्न रुद्र्भट्टे, योगेश गंगतीरे, लखन नाळे, राजेंद्र गोडसे,अभिजीत सरगर, प्रकाश सस्ते, सुमित चोरमले, श्रीकृष्ण सातव, सदाशिव मोहिते,बापूराव जगताप,कुमार मोरे, विनायक शिंदे, उमेश गार्डे, संजय जामदार, अनिल पिसाळ, अमोल नाळे, अभिषेक सरगर व ईतर पत्रकार यावेळी उपस्थित होते.