Phaltan news -
राशीन (जि. अहमदनगर ) येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकातील महात्मा फुले नामफलकाची तोडफोड व विटंबना करीत जातीवाचक शिवीगाळ काही स्थानिक समाजकंटकांनी केली. या घटनेचे तीव्र पडसाद फलटण येथे पाहायला मिळाले. या घटनेविरुद्ध फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी फलटण यांना निवेदन दिले. यावेळी ओबीसी बांधवांनी निदर्शने केली.
राशीन येथील घटनेबरोबरच वीर, ता. पुरंदर येथील ओबीसी युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राशीन येथील फुलेंच्या नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना दडपण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटतील, असे निवेदनात फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने नमूद केले आहे.
यावेळी बापूराव शिंदे, नंदकुमार नाळे, गोविंद भुजबळ, मुनिष जाधव, पिंटू इवरे, आमिर शेख, दत्ता नाळे, विकास नाळे, संदीप नेवसे, रणजित नाळे, अमोल रासकर, अमोल शिंदे, ऋषिकेश काशीद, डॉ. रणजित बनकर, बापूराव बनकर, बाळासाहेब ननावरे, ऋषिकेश शिंदे, बंडू शिंदे, शनेश शिंदे, रोहन शिंदे, प्रवीण फरांदे, विजय शिंदे, दीपक शिंदे, किरण राऊत, बाळासाहेब घनवट, दिनेश शिंदे, अभिजित शिंदे, किरण जाधव यांची उपस्थिती होती.