फलटण धैर्य टाईम्स :
15 ऑगस्ट, 2025 रोजी, स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे आणि या दिवसाच्या तयारीला वेग आला आहे. याच अनुषंगाने फलटण येथील नगर परिषदेच्या इमारतीवर तिरंगा राेषनाई सजावट करण्यात आली आहे. ही तिरंगा रोषणाई फलटणकरांचे आकर्षण ठरत असून सोशल मीडियावर पालिकेची इमारत झळकू लागली आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी शहर साैंदर्यीकरणामध्ये शहरातील विद्युत खांबांना तिरंगा राेषनाई करण्यात आली असून संपूर्ण शहर तिरंग्याने उजळून निघाले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत फलटण नगरपरिषदेने हर घर तिरंगा हे अभियान उस्फुर्तपणे राबविले हाेते. तर यावर्षी हर घर तिरंगा माेहिम २०२५ दिनांक ०२ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत सुरू आहे. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, तिरंगा रॅली, यासह दिनांक १५ ऑगस्ट राेजी सेल्फी पाॅइंट, विविध कार्यक्रम नगरपरिषदेने आयाेजीत केले आहेत.
शहर साैंदर्यीकरणामध्ये शहरातील विद्युत खांबांना तिरंगा राेषनाई करण्यात आली असून संपूर्ण शहर तिरंग्याने उजळून निघाले आहे. नगरपरिषदेच्या इमारतीवर तिरंगा राेषनाई केली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल माेरे यांच्या सौंदर्य नजरेतून फलटणला देखणे रूप दिले आहे. हर घर तिरंगा ही माेहिम राबविण्यासाठी मुख्याधिकारी यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी परिश्रम घेत आहेत.