फलटण : धैर्य टाईम्स
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती आणि समृद्ध विचाराने लोकांची मस्तके परिवर्तन करण्यासाठी आलेल्या बारामती कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी मानेवाडी ता. फलटण येथे कृषी सभेच्या माध्यमातून गावकरी तसेच शेतकरी यांना कृत्रिम बुद्धिमत्ताचे ( Artificial intelligence ) चे शेतीतील महत्त्व पटवून दिले.
या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शक ऋषिकेश कदम सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्याना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शेतीतील फायदे शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने पटवून दिले.
याप्रसंगी सरपंच राजेंद्र जाधव व उपसरपंच मच्छिंद्र कदम व ग्रामसेवक बोराटे साहेब व गावातील इतर शेतकरी आणि कृषिदूत साहिल भिलारे,अपूर्व बांगर,शुभम गुरव,ओमप्रकाश साळुंखे निखिल सोडल,यशराज खटके,शिवराज घोडके उपस्थित होते. विद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांच्या व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार आहेत.