फलटण प्रतिनिधी -
पश्चिम महाराष्ट्राचा आपण दौरा केला असून मुंबईमध्ये 29 ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर मराठा समाज येणार आहे. मराठा आरक्षणासाठी आता एक घर एक गाडी असा नारा दिला असून मराठ्यांनी आता घरात बसू नये. अस्तित्व संपल्यानंतर पुन्हा येणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या काळजावर वार केला असून सर्व मराठ्यांना ताकतीन उभे राहावे असे आवाहन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले. २९ ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजाच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठीत फलटण येथे आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
मराठा शांततेमध्ये मुंबईला जातो शांततेत लढतो, मागणी करतो याचा गैरफायदा आता सरकार घ्यायला लागले आहे तर आपल्या अंगावर लोक सोडण्याच काम देवेंद्र फडणवीस करू लागले आहेत त्यामुळे मुंबईला ताकतीने उभे राहणे गरजेचे असल्याचे असे जरांगे पाटील म्हणाले. ही आता अंतिम लढाई असून समाज हारता कामा नये असे जरांगे पाटील म्हणाले. हसू होईल असे एकाही मराठ्याने वागू नये. राजकारण पायाखाली तुडवावे पण लेकरं मोठं करण्यासाठी मराठ्यांनी रस्त्यावर येणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
देवेंद्र फडवणीस यांचा मराठा ओबीसी दंगली लावण्याचे स्वप्न असल्याचा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला परंतु मराठा ओबीसी वाद होणार नाहीत असे सांगतानाच ओबीसी साठी देवेंद्र फडणीस यांनी काय केले असा सवाल उपस्थित करतानाच भांडणे लावण्या पलीकडे काय केले असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे आता मराठा समाजाने पाठीमागे उभे राहावे मी तुमच्या लेकरा बाळांसाठी दिवस-रात्र राबतोय त्यांनी दंगली लावण्याचे तयारी सुरू केले आहे त्यामुळे मराठ्यांनी बेसावध राहू नये, मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जाऊ नये त्यांच त्यांचा स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले.
देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला आरक्षण देतो म्हणत आहेत परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, हे चांगले झाले असून यामुळे सरकारमध्ये असणाऱ्या मराठ्यांचे डोळे उघडतील, त्याच्या पोटातील आता ओठावर आले असून नियतीला हे मान्य नसून त्याच्या पोटातील बाहेर आले ते खूप चांगले झाले. त्यामुळे तुम्हाला निवडून आणायला सत्तेत बसवायला ठेका घेतला आहे का? मराठ्यांची लोक तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी रात्रंदिवस पळत होती. केवळ ओबीसीसाठी लढणार व मराठा आरक्षणासाठी लढणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत हे योग्य नसून धनगर समाजाला आरक्षण दिले का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. धनगर - मराठा वेगळे केले मुस्लिम - दलित वेगळे केले असून किती फसवणूक करणार आहात असे जरांगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याला ओबीसीच्या आरक्षणाविषयी मीटिंग घेऊन ओबीसी - मराठा समाजामध्ये दंगल लावणार असल्याचा आरोप यावेळी जरांगे यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठा व ओबीसी मध्ये दंगल होणार नाही असा विश्वास यावेळी जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. तुम्ही सत्तेवर येण्यासाठी कधी मराठा, धनगर, मुस्लिम, दलित यांना हाताशी धरले जात आहे. परंतु जर राज्यात ओबीसी मराठा दंगल झाली तर याला जबाबदारी तेव्हा देवेंद्र फडणवीस असतील असे विधान जरांगे पाटील यांनी काढले.
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने मराठा समाजाचा जागा झाला असून मुलांना आत्महत्या करायची वेळ देऊ नका जागे व्हा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
धनंजय मुंडे यांना अजितदादा व मुख्यमंत्री मंत्रिपद देणार नाहीत असे एका प्रश्नाला उत्तर देताना जरांगे म्हणाले. स्वतःच्या भाऊजयला न्याय देता येत नाही तर संतोष भैयाचा मर्डर त्यांच्याच लोकांनी केला असल्याचे जरांगे म्हणाले. तर ते चाळीस कॉल कुणाचे आहेत असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
मराठ्यांचे आरक्षण ओबीसी मधून घेणार असून आरक्षण कसे मिळत नाही असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिले. तर राज्यातील सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे असे वाटत असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना शेवटी मनोज जरांगे पाटील म्हणाले.