फलटण प्रतिनिधी -
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सांगितले होते,आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही त्यामुळे तब्बल पाच मागण्या पूर्ण झाल्या असून सातारा गॅझेट व औंध संस्थांच्या नोंदी बाबत थोडी मुदत दिली आहे.त्यामुळे सातारा गॅझेट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कुणबी व मराठा एकच त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे दरम्यान याबाबत जीआर काढण्यात आला असल्याचे स्पष्ट होताच फलटण तालुक्यातील मराठा बांधवानी आझाद मैदान मुंबई येथे या आरक्षणाचा विजयोत्सव साजरा केला.
गेली पाच दिवस संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणास बसले होते त्यांनी आपल्या समाजातील लोकांची भावना राज्य सरकारकडे मांडली होती त्यास दोन दिवस राज्य सरकार व उपसमिती कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पाहून लाखो मराठे मुंबईकडे रवाना झाले त्यामध्ये फलटण तालुक्यातील हजारो मराठा बांधव मुंबईच्या लढ्यासाठी गेले व या लढ्यात सहभागी झाले.
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की मी सोमवार दि.1 सप्टेंबर पासून पाण्याचा घोटही घेणार नाही असा पवित्रा घेतला अन् राज्य सरकार बैठका वर बैठका घेऊ लागले व आज मंगळवारी उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सातारा जिल्ह्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मंत्री कोकाटे सावंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या व तसा जीआर काढण्यात आला व अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या व तिथे तब्बल पाच दिवसांपासून तळ ठोकलेल्या फलटण तालुक्यातील मराठा बांधवांनी गुलाल उधळला व एकच जल्लोष केला यावेळी हजारो मराठा बांधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय व एक मराठा लाख मराठा घोषणेने आझाद मैदान दणाणून सोडले.