फलटण दि. १० ऑगस्ट : कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या मुख्य बाजार आवारातील रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजीच्या साप्ताहिक भुसार बाजारातील शेतमालाची आवक व दरांबाबत माहिती पुढीलप्रमाणे : ज्वारी आवक ८१ किंटल, दर प्रति क्विंटल २५०० ते ३४०१ रुपये, बाजरी आवक २३८
क्विंटल, दर प्रति क्विंटल २५०० ते ३००० रुपये, गहू आवक ४१४ क्विंटल, दर प्रति क्विंटल २५०० ते २८७५ रुपये, हरभरा आवक ५२ किंटल, दर प्रति क्विंटल ५००० ते ६१०० रुपये, मका आवक ४० क्विंटल, दर प्रति क्विंटल २२०० ते २५०१ रुपये, घेवडा आवक २० किंटल, दर प्रति क्विंटल ४००० ते ५९०० रुपये, मूग आवक १ किंटल, दर प्रति क्विंटल ५२०० रुपये, उडीद आवक ८ क्विंटल, दर प्रति किंटल ५२०० ते ६१०० रुपये.