फलटण प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे घेण्यात आलेल्या कृषी विभागाच्या परीक्षेमध्ये मंगळवार पेठ, फलटण येथील कु. प्रतीक्षा गौतम काकडे यांची कडेगाव जि. सांगली या विभागामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी या पदावरती निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर, फलटण ( बाजारे शाळा) तर माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण व उच्च माध्यमिक शिक्षण मालोजीराजे कृषी महाविद्यालय फलटण येथे झाले आहे. त्यांची सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्या बद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.