फलटण प्रतिनिधी : जाधववाडी (फ) ता. फलटण येथे ग्रामसेवक हिम्मतराव रामचंद्र गायकवाड यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी येथे सरपंच श्रीमती सीमा आबाजी गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यावेळी उपसरपंच राहुल शिंदे, सदस्य, सौ. सारिका चव्हाण, सौ. स्वाती जाधव, दीपक सपकाळ, भगवान लकडे, सचिन मदने, सौ. मंगल घनवट, सौ. सोनाली पवार, सौ. नयन जगदाळे, सौ. रेखा नाळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, अशासेविका, व मदतनीस, उपस्थित होते