फलटण प्रतिनिधी :
अनुसूचित जाती जमाती उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या सदस्यपदी आमदार सचिन पाटील यांच्यासह इतरांच्या इतरांच्या निवडी झाल्या आहेत.
फलटण तालुक्यात अनुसूचित जाती जमाती उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समिती स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये सदस्यपदी आमदार सचिन पाटील यांच्यासह माजी नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे, सचिन रमेश अहिवळे, सनी घनश्याम काकडे, यांची तर गोविंद अरुण मोरे, ॲड. बापूसाहेब शिलवंत, वैभव तानाजी गिते यांची (केंद्रीय नामनिर्देशन सदस्य ) म्हणून सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकरी फलटण तर सचिवपदी गट विकास अधिकारी पंचायत समिती फलटण हे असणार आहेत.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता समिती फलटण शहर व फलटण तालुक्यात अनेक वर्षांनी ही बैठक आयोजित केली होती. या पूर्वीची दक्षता समिती ही नामधारी फक्त रेकॉर्ड वरती होती. तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती च्या 59 जाती असून अनुसूचित जाती जमातीच्या अन्याया बाबत अनेक वर्षात आवाज उठवला गेला नाही. नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन होत आहे.