फलटण प्रतिनिधी : 3 ऑगस्ट
मांडवखडक ता. फलटण येथील नंदकुमार ननावरे यांनी त्यांच्या पत्नी सह नुकतीच उल्हासनगर येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ मध्ये ननावरे यांनी काही व्यक्तींनी आपल्याला दिलेल्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे मात्र यामधील घेतलेले रणजित नाईक निंबाळकर हा व्यक्ति आपण नसून फलटण मधेच अशा नावाचे अनेक व्यक्ती असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्याला ऑडिओ क्लिप द्वारे म्हटले आहे.
यासंबंधित सविस्तर माहिती अशी नंदकुमार ननावरे यांनी त्यांच्या पत्नी सह आत्महत्या केली त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीसह एक व्हिडिओ रेकॉर्डिंग केला त्या मध्ये काही लोकांनी आपल्याला दिलेल्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. तर आपल्या मृत्यू नंतर आपल्या मुलांनी आपल्या मूळ गावी म्हणजे मांडवखडक ता. फलटण येथे अपल्या कुटुंबासह रहावे अशी सूचना केली आहे. व आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांवरती गुन्हा दाखल करून योग्यती कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी व्हिडीओ द्वारे केली आहे.
या व्हिडीओ मध्ये रणजित नाईक निंबाळकर या नावाचा उल्लेख केला असून या नावाच्या अनेक व्यक्ती फलटण सह महाराष्ट्र आहेत त्यामुळे आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऑडिओ क्लिपद्वारे कळविले आहे. आपण या व्यक्तीला ओळखत नसून कधीही भेटलो नाही मात्र झालेली घटना दुर्दैवी असून या घटनेचा विशेष तपास करावा अशी मागणी स्वतः खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.