अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा दि.७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ : ०० वा. पासून सजाई गार्डन लॉन्स , फलटण विंचुर्णी रोड विमानतळा शेजारी, फलटण येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने स्व - स्वरूप संप्रदायातील भक्त, शिष्य, साधक, चाहते उपस्थित राहणार आहेत.
या पादुका दर्शन सोहळ्याचे अतिशय भव्य नियोजन स्व - स्वरूप संप्रदाय मुख्यपीठ नाणीज धाम, क्षेत्र सातारा यांनी केले आहे. यामध्ये जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांची फलटण शहरातून भव्य मिरवणूक काढून कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत होईल. सिद्ध पादुकांचे कार्यक्रम ठिकाणी आगमन होईल तदनंतर सामाजिक उपक्रम अंतर्गत गरजू शेतऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते होईल. भक्तगणांच्या उपस्थितीत पादुका पूजन होईल. आरती सोहळा व अमृतमय प्रवचनानंतर उपासक दीक्षा दिली जाणार आहे. भाविकांना यावेळी सिद्ध पादुकांचे दर्शन घेता येईल. स्व-स्वरूप सांप्रदायाच्या वतीने महाप्रसाद दिला जाणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी आव्हान केले आहे. त्यानंतर पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाचे सांगता होईल.