19 फेब्रुवारीपूर्वी थकीत शेतीपंप वीजबिलासंदर्भात फलटण तालुक्यातील बंद करण्यात आलेले डी.पी.आता पूर्ववत सुरु करण्यात आले असल्याची माहिती यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सदस्य व खा. रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा थकीत वीज बिल शेतीपंपाचा वीज पुरवठा बंद होऊ देणार नसल्याची ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सदस्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली, ते फलटण येथे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश जमाले, फलटण ग्रामीण उपविभागीय उप कार्यकारी अभियंता भारत खिलारे, कार्यकारी फलटण शहर उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन कोरडे, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्या सह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा. निंबाळकर म्हणाले की, आपण गेली दहा ते पंधरा दिवस राज्य सरकारचे संपर्क साधून शेतकऱ्यांची थकीत वीज बिलामुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये याकरिता प्रयत्न करीत होतो. आपल्या या प्रयत्नांना यश आले असून केवळ चालू महिन्याचे वीजबिल शेतकऱ्यांनी भराल्यास थकीत वीजबिला साठी कोणत्याही शेतकऱ्यांचे वीजबिल खंडित केले जाणार नसल्याचे यावेळी खासदार निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
19 फेब्रुवारीपूर्वी थकीत शेतीपंप वीजबिलासंदर्भात फलटण तालुक्यातील बंद करण्यात आलेले डी.पी.आता पूर्ववत सुरु करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी खा. निंबाळकर यांनी दिली.