फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील धूळदेव, ढवळेवाडी (आसू), शिंदेमाळ, कोळकी, विडणी, होळ, तावडी, गुणवरे, गोळेवाडी , परहर बु|| , उळुंब अशा ११ ग्रामपंचायती मधील १५ जागांसाठी पोट निवडणूका जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.
११ ग्रामपंचायती मधील १५ जागांसाठी पोट निवडणूका तपशील पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे. यामध्ये धूळदेव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधील १ जागा (सर्वसाधारण स्त्री), गोळेवाडी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक १ मधील १ जागा (सर्वसाधारण स्त्री), प्रभाग क्रमांक २ मधील १ जागा (सर्वसाधारण), क्रमांक २ मधील १ जागा (अनुसूचित जाती), ढवळेवाडी (आसू) प्रभाग क्रमांक १ मधील १ जागा (सर्वसाधारण स्त्री), शिंदेमाळ प्रभाग क्रमांक २ मधील १ जागा (ना.मा. प्रवर्ग स्त्री), कोळकी प्रभाग क्रमांक ६ मधील १ जागा (ना.मा. प्रवर्ग स्त्री), विडणी प्रभाग क्रमांक ६ मधील १ जागा (ना.मा. प्रवर्ग), होळ प्रभाग क्रमांक २ मधील १ जागा (अनुसूचित जमाती), परहर बु|| प्रभाग क्रमांक १ मधील १ जागा (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक २ मधील १ जागा (सर्वसाधारण स्त्री), उळूऺब प्रभाग क्रमांक २ मधील १ जागा (अनुसूचित जाती), प्रभाग क्रमांक ३ मधील १ जागा (सर्वसाधारण), तावडी प्रभाग क्रमांक १ मधील १ जागा (ना.मा. प्रवर्ग), गुणवरे प्रभाग क्रमांक ३ मधील १ जागा (सर्वसाधारण) या नुसार निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.
सदरचा पोट निवडणूक कार्यक्रम मंगळवार दि. १८ एप्रिल रोजी तहसीलदार समीर यादव जाहीर करणार असून त्यानुसार मंगळवार दि. २५ एप्रिल ते मंगळवार दि. २ मे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस सोडून) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.बुधवार दि. ३ मे रोजी सकाळी ११ पासून संपेपर्यंत दाखल सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करुन त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. आवश्यक असेल तर गुरुवार दि. १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात येणार असून शुक्रवार दि. १९ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.