सातारा दि. 22 : कराड येथे दि. 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये कृषी अन्न प्रक्रिया उद्योग करणारे वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, युवक/ महिला उद्योजक, नवउद्योजक, प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, गट, कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी कंपनी, शासन यंत्रणा, खाजगी उद्योग व एसपीव्ही इत्यादी विक्रेता म्हणून सहभाग घेवू शकतात. यासाठी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, पीएमएफएमई/मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना लाभार्थी व त्यासाठी अर्ज केलेले अर्जदार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. खरेदीदार विक्रेता हे बायर टु बायर, बायर टु कंझ्युमर, किरकोळ विक्रेते, घाऊक व्यापारी, निर्यातदार असणे अपेक्षित आहे. संमेलनामध्ये 10 खरेदीदार व 40 विक्रेते यांचा समावेश असणार आहे.
तरी संमेलनाकरिता इच्छुक खरेदीदार-विक्रेता यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,सातारा येथे आपल्याकडील खरेदीविक्री तपशिलासह दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सहभाग नोंदवावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी कळविले आहे


















