Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन

अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय

टीम : धैर्य टाईम्स

फलटण, (प्रतिनिधी) :


हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र ही आजची गंभीर जागतिक चिंता असताना, महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने फलटणमध्ये सुरू केलेला ‘अटल आनंद घनवन’ प्रकल्प पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आशादायी आणि दूरगामी पाऊल ठरणार आहे, असे वनपरिक्षेत्रपाल निकिता बोटेकर यांनी सांगितले.


वन विभागाच्या कार्यालयालगत सुमारे १.५ हेक्टर क्षेत्रात ४५ हजार देशी वृक्षांची लागवड करून जैवविविधतेने समृद्ध घनवन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. फलटणमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थांच्या प्रमुखांच्या हस्ते वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोटेकर बोलत होत्या.


बोटेकर म्हणाल्या की, ‘अटल आनंद घनवन’ हा फलटणच्या पर्यावरण इतिहासातील हरित पर्वाची नवी सुरुवात ठरणार आहे. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते; मात्र संगोपनाअभावी अनेक रोपे नष्ट होतात. या प्रकल्पात प्रत्येक रोपाचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली असून, लावलेले प्रत्येक रोप मोठे वृक्ष बनावे, यासाठी वन विभाग विशेष प्रयत्न करणार आहे.


देशी वृक्षप्रजातींमुळे जैवविविधतेचे संवर्धन, भूजल पातळीत वाढ, मृदसंवर्धन, तापमान नियंत्रण, स्वच्छ हवा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यात हा परिसर पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांसाठी निसर्ग अभ्यासाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचाही वन विभागाचा मानस आहे.


दाट घनवनामुळे पक्षी, फुलपाखरे, मधमाशा तसेच विविध वन्यजीवांना सुरक्षित अधिवास उपलब्ध होतो. त्यातून नैसर्गिक अन्नसाखळी मजबूत होऊन परिसंस्थेचा समतोल राखण्यास मदत होते. तसेच मोठ्या प्रमाणात कार्बन शोषला जात असल्याने हवामान बदलाच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठीही या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होते.


फलटण परिसरातील पर्यावरण अधिक समृद्ध करण्याबरोबरच भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘अटल आनंद घनवन’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


कार्यक्रमास वनपाल नितीन जगदळे, वनरक्षक अर्चना लोखंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER