फलटण प्रतिनिधी :
छत्रपती संभाजीनगर येथील १०८६ शिक्षकांवर घरभाडे भत्ता व अन्य प्रशासकीय बाबींमध्ये झालेल्या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ फलटण तालुका सर्व संघटना प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून सर्व शाळांमध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील), शिक्षक संघ (संभाजीराव थोरात), शिक्षक समिती, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भारती संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना तसेच अन्य शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष धनंजय सोनवलकर, तालुकाध्यक्ष संतोष कोळेकर, जिल्हा कोषाध्यक्ष अनिल शिंदे, संचालक राजेंद्र बोराटे, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष राजेश बोराटे, शिक्षक संघाचे नेते संतोष निंबाळकर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रविण तरटे, शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष लालासाहेब भंडलकर, संघाचे सरचिटणीस सतीश जाधव, शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस तानाजी वाघमोडे, शिक्षक संघ फलटणचे कोषाध्यक्ष सागर लोंढे, शिक्षक समितीचे जिल्हा प्रवक्ते राजेंद्रप्रसाद निकाळजे, शिक्षक समितीचे संघटक धन्यकुमार तारळकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.













