Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड

बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 


श्री भैरवनाथ संस्था समूहाचे प्रमुख, श्री भैरवनाथ मल्टिस्टेटचे संस्थापक व मार्गदर्शक संचालक, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब श्रीरंग मोहोळकर (कासार) यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी आदर्की बुद्रक, ता. फलटण येथे करण्यात येत असून त्यामध्ये सहभागी होवून परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


बाळासाहेब मोहोळकर (कासार) यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ संस्था समूह व सेवा सदन लाईफ लाईन हॉस्पिटल, मिरज यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य व बालाजी ब्लड बँक, सातारा यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.


बालाजी ब्लड बँक, सातारा यांच्या रक्तदान माध्यमातून शिबिराचे आयोजन सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळात भैरवनाथ सांस्कृतिक आदर्की पतसंस्था भवन, बुद्रक व ॲम्बिशन इंग्लिश मीडियम स्कूल आदर्की बुद्रक, ता. फलटण येथे करण्यात येत आहे.


रक्तदान महादान जीवनदान चला जोडू या रक्ताचे नाते या उद्देशाने रक्तदान शिबिरात १८ ते ६५ वर्षापर्यंत कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करण्यासाठी ५ ते १० मिनिटांचा वेळ लागतो. निरोगी व्यक्तीचे रक्त ३५० ते ४५० मि. ली. घेतले जाते. ते भरून येण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी लागतो. एका रक्तदानाचा फायदा चार रुग्णांना होऊ शकतो. रक्तदानाने अशक्तपणा, थकवा किंवा लैंगिक शक्तीचा ऱ्हास होतो हा गैरसमज आहे. रक्तदानाने दुसऱ्याचे जीव वाचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व रक्तगट कार्ड दिले जाईल. 


रक्तदान केल्यानंतर शरीरात नवीन रक्त तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना मिळते. रक्तदात्याला स्वतःसाठी आयुष्यभर एक रक्त बाटली मोफत दिली जाईल. रक्तदात्याच्या आई, वडील, भाऊ, बहीण (लग्नाअगोदर), पत्नी, मुले यांच्यासाठी दोन वर्षापर्यंत एक रक्त बाटली मोफत दिली जाईल, रक्तदात्याच्या तसेच मित्रपरिवारास रक्ताची गरज भासल्यास सवलतीच्या दरामध्ये रक्त देण्यात येणार असल्याचे बालाजी ब्लड बँक, सातारा यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.


सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सेवासदन लाईफ लाईन हॉस्पिटल मिरज यांच्या सहकार्याने आदर्की व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, युरोलॉजी, डोळे, कॅन्सर, रक्त तपासणी मोफत करण्यात येणार असून किडनी स्टोन शस्त्रक्रिया


आणि अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. पॅरालिसीस, अपंग, लाळेपणा, संधिवात अशा लोकांसाठी अल्पदरात पंचकर्म उपचार केले जाणार आहेत.


लहान मुलांना छातीत होल असणे तसेच कान, नाक, घसा शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. डोळ्यांचे मोतीबिंदू, लासरू, काचबिंदू, रेटिना लासरू, मांस काढणे अशा सर्व नेत्र शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. त्यासाठी रुग्णाने स्वतःचे रेशनकार्ड व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.


भैरवनाथ संस्था समूहाच्या माध्यमातून आदर्की व पंचक्रोशीत विविध प्रकारचे वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ बाळासाहेब मोहोळकर (कासार) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्की बुद्रक येथे करण्यात येणार आहे. आदर्की व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER