फलटण प्रतिनिधी :
फलटण डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेत असोसिएशनच्या अध्यक्षपदी फलटण येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. निनाद दोशी यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ. चेतन गुंदेचा, महिला उपाध्यक्षपदी डॉ. शिल्पा गांधी, सचिवपदी डॉ. निखिल गांधी, तर खजिनदारपदी डॉ. सागर तेली यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष डॉ. बी. के. यादव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. निनाद दोशी यांच्यासह नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दिगंबर जैन जागरण युवा संघाचे प्रवक्ते तसेच जैन सोशल ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य असलेले नूतन अध्यक्ष डॉ. निनाद दोशी यांनी असोसिएशनने सोपविलेली अध्यक्षपदाची जबाबदारी पूर्ण क्षमतेने, कल्पकतेने आणि सर्वांच्या सहकार्याने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी शहरासह तालुक्यातील डॉक्टर मोठया संख्येने उपास्थित होते.

















