Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी :


अनेकदा पालक आपल्या मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विविध क्षेत्रांमध्ये करिअरची निवड करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यामुळे अनेक मुले-मुली अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखणे गरजेचे असून, त्यानुसार त्यांना शिक्षण व योग्य मार्गदर्शन दिल्यास मुले आपल्या आवडीच्या क्षेत्रात निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे यांनी केले.


खांडज, ता. बारामती येथील ब्रिलीयन्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रारंभी सचिन मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था प्रमुख तानाजी जाधव गुरुजी, डॉ. सुभाष गुळवे, दिलीप देवकाते, मुख्याध्यापिका सौ. सीमा जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. मुलांना शिस्त लावताना केवळ उपदेश करण्यापेक्षा पालकांनी स्वतः त्या गोष्टी आचरणात आणून मुलांसमोर आदर्श निर्माण करावा, असे सचिन मोरे यांनी सांगितले. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे गुण व क्षमता असतात. ते ओळखून विद्यार्थ्यांना योग्य प्रेरणा व दिशा देणे हे शिक्षकांचे महत्त्वाचे काम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सचिन मोरे म्हणाले की, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे. अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या त्यागामुळे आपण आज मुक्त भारतात सन्मानाने जगत आहोत. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही; मात्र त्यांच्या विचारांवर चालून त्यांना खरी आदरांजली वाहू शकतो असे मोरे म्हणाले.


खांडज सारख्या ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम स्कूल उभी करून ती यशस्वीपणे चालविणे हे निश्चितच कौतुकास्पद व धाडसाचे काम असल्याचे सांगत सचिन मोरे यांनी संस्था प्रमुख व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.


यावेळी डॉ. सुभाष गुळवे यांनी विद्यार्थ्यांना पालक व गुरुजनांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. आजच्या काळात मोबाईल व सोशल मीडियाचा वापर आवश्यक असला तरी त्याचा विवेकाने वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. वेळेचे नियोजन करा, चांगली पुस्तके वाचा, शिक्षकांचा आदर करा, पालकांचा सन्मान करा आणि ध्येयासाठी सातत्याने मेहनत घ्या. अपयश आले तरी खचून जाऊ नका; कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे त्यांनी सांगितले.


मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान


देवांश निखिल बुरुंगले, सानिका विराज घाडगे,आदिती दत्ता आटोळे शिवन्या अजित गोसावी, निमय मानसिंग जाधव, विरप्रताप तानाजी जराडे, पार्थ सुनिल जाधव, काव्या विवेक सुर्यवंशी, देवा वसंत गावडे श्रेयश सुग्रीव मंडलकर, स्वरा राहूल ढवळे, प्रमय मानसिंग जाधव, आराध्या मालोजी जाधव, श्रेया राहूल ढवळे या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 


प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती वर भाषणे केली व विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. विध्यार्थीना बिस्कीट, चॉकलेटचे वाटप करण्यात आले.


कार्यक्रमास तानाजी जाधव, ॲड.किरण कांबळे विवेक सूर्यवंशी, जयप्रकाश आटोळे, सोमनाथ जरांडे, भाऊ पोंदकुले, सुभाष भंडलकर, काका व्यवहारे, मामा हरिहर यांच्यसह पालक मोठया संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका सौ. सीमा जाधव मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.अमृता झिंगरे मॅडम यांनी केले व आभार सौ. सुप्रिया सोरटे मॅडम यांनी मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER