फलटण, दि. २९ जुलै :
जाधववाडी येथील ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज (दि. २९ जुलै) सायंकाळी ७.०० वाजता गिरवी येथे भवानी मातेच्या मंदिराच्या पाठीमागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










