Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

जिल्ह्यात खरिपाची 55.39 टक्के पेरणी

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 24 : सातारा जिल्ह्यात खरिपाचे लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 86 हजार 973 हेक्टर असून यापैकी 2 लाख 14 हजार 342 प्रत्यक्ष हेक्टर म्हणजेच 55.39 टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेली आहे.

            जिल्ह्यात भात पिकासाठी 43 हजार 978 हेक्टर क्षेत्रापैकी 28 हजार 477  हेक्टर क्षेत्रात म्हणजे 65 टक्के क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली आहे, यामध्ये पाटण तालुक्यात 16 हजार 257 क्षेत्र भात लागवडीचे असले तरी प्रत्यक्षात 13 हजार 720 हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे.

            खरीप ज्वारीचे जिल्ह्यात 11 हजार 153 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 7 हजार 185.8 म्हणजेच 64 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीचे पाटण तालुक्यात 4 हजार 732 हेक्टर पैकी 4 हजार 620 हेक्टरवर तर कराड तालुक्यात 4 हजार 352 हेक्टरपैकी 2 हजार 402 हेक्टरवर खरीप ज्वारीची पेरणी झाली आहे.

            बाजरी पिकासाठी जिल्ह्यात 60 हजार 734 हेक्टर क्षेत्रापैकी 17 हजार 269.5 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 28 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, यामध्ये माण तालुक्यात 31 हजार 542 हेक्टर पैकी 11 हजार 914 हेक्टरवर, खटाव तालुक्यात 11 हजार 144 हेक्टरपैकी 1 हजार 178 हेक्टरवर तर फलटण तालुक्यात 7 हजार 122 हेक्टरपैकी 1 हजार 866 हेक्टवर बाजरीची पेरणी झाली आहे.

            मका पिकासाठी जिल्ह्यात 15 हजार 190 हेक्टर क्षेत्रापैकी 8 हजार 771.7 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 58 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, यामध्ये खटाव तालुक्यात 5 हजार 281 हेक्टर पैकी 3 हजार 632 हेक्टरवर, तर माण तालुक्यात 4 हजार 39 हेक्टरपैकी 2 हजार 119 हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. तसेच इतर तृण धान्याची जिल्ह्यात 447 हेक्टर क्षेत्रापैकी 227 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 51 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, याप्रमाणे एकूण तृण धान्याची जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 093  हेक्टर क्षेत्रापैकी 65 हजार 587.9 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 48 टक्के क्षेत्रात तृणधान्याची पेरणी  झाली आहे.

            जिल्ह्यात तूर पिकासाठी 975 हेक्टर क्षेत्रापैकी 382  हेक्टर क्षेत्रात म्हणजे 39 टक्के क्षेत्रात तूरीची लागवड करण्यात आली आहे, यामध्ये पाटण तालुक्यात 315 क्षेत्र तूर लागवडीचे असले तरी प्रत्यक्षात 244 हेक्टर क्षेत्रावर तूरीची पेरणी झाली आहे, तर खटाव तालुक्यात 254 क्षेत्र तूर लागवडीचे असले तरी प्रत्यक्षात 2 हेक्टर क्षेत्रावर तूरीची पेरणी झाली आहे.

            खरीप मुगाची जिल्ह्यात 9 हजार 372 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 5 हजार 820 म्हणजेच 62 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मुग पिकाचे खटाव तालुक्यात 6 हजार 275 हेक्टर पैकी 1 हजार 159 हेक्टरवर तर माण तालुक्यात 1 हजार 994 हेक्टरपैकी 3 हजार 885 हेक्टरवर खरीप मुगाची पेरणी झाली आहे.

            उडीद पिकासाठी जिल्ह्यात 2 हजार 115 हेक्टर क्षेत्रापैकी 1 हजार 92 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 52 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, यामध्ये खटाव तालुक्यात 1 हजार 169 हेक्टर पैकी 573 हेक्टरवर, पाटण तालुक्यात 285 हेक्टरपैकी 283 हेक्टरवर उडीद पिकाची पेरणी झाली आहे.

            जिल्ह्यात भुईमुग पिकासाठी 29 हजार 435 हेक्टर क्षेत्रापैकी 24 हजार 650.2  हेक्टर क्षेत्रात म्हणजे 84 टक्के क्षेत्रात भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे, यामध्ये पाटण तालुक्यात 11 हजार 310 क्षेत्र भुईमुग लागवडीचे असले तरी प्रत्यक्षात 10 हजार 918 हेक्टर क्षेत्रावर, व कराड तालुक्यात 9 हजार 443 क्षेत्रापैकी प्रत्यक्षात 7 हजार 675 हेक्टर क्षेत्रावर, तर सातारा तालुक्यात 3 हजार 799 हेक्टर क्षेत्रापैकी 3 हजार 340 क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली आहे.

            सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यात 74 हजार 800 हेक्टर क्षेत्रापैकी 74 हजार 452 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 100 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे, यामध्ये कराड तालुक्यात 17 हजार 584 हेक्टर पैकी 15 हजार 890 हेक्टरवर, सातारा तालुक्यात 21 हजार 246 हेक्टरपैकी 20 हजार 710 हेक्टरवर, पाटण तालुक्यात 8 हजार 896 हेक्टर पैकी 8 हजार 635 हेक्टरवर, तर कोरेगांव तालुक्यात 9 हजार 717 हेक्टरपैकी 7 हजार 636 हेक्टरवर सोयबीनची पेरणी झाली आहे.

            यासह इतर तृणधान्य, कडधान्य, तेलबिया व कापूस इ. पिकांच्या क्षेत्रांचाही समावेश आहे. तसेच जिल्ह्यात उसाची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. उसाच्या पिकासाठी जिल्ह्यात 98 हजार 479 हेक्टर क्षेत्रापैकी 1 लाख 16 हजार 711 हेक्टर क्षेत्रात म्हणजे 119 टक्के क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER