सातारा दि. 23 : केंद्रीय सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्यात इच्छुक पात्र व समक्ष वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थींची माहिती संसाधन व्यक्ती व कृषि सहायक यांच्या मार्फत घेऊन आवश्यक कागदपत्रांची प्रतिसह ऑनलाईन अर्ज करणे, लाभार्थ्यांचे कागदपत्रांची बँक अधिकाऱ्यांसमक्ष पडताळणी करणे, कर्ज मंजुरीस्तव जर काही कागदपत्रे उपलब्ध नसतील तर त्याची माहिती संबंधित लाभार्थ्यास देऊन त्याची पूर्तता करुन घेण्यात यणार आहे.
तरी इच्छूक लाभार्थ्यांनी पंधरवडा कार्यक्रमात सहभाग घेऊन अर्ज सादर करावेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा संसाधान व्यक्ती, कृषि सहायक, मंडल कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.


















