फलटण :
मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असून, समस्या निर्माण झाल्यानंतरच नव्हे तर मानसिक आरोग्य जपण्यासाठीही समुपदेशनाची गरज आहे असून मानसिक आरोग्य हीच खरी घनसंपदा असल्याचे मत मनोविकास मानसशास्त्रीय समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र, फलटणचे समुपदेशक व नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटणचे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.दिपक रामचंद्र राऊत पवार यांनी व्यक्त केले. ते फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘Mental Health – Challenges and Remedies’ (मानसिक आरोग्य : आव्हाने व उपाययोजना) या विषयावर विशेष तज्ज्ञ मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, महाविद्यालयाच्या समुपदेशन केंद्र, मानसशास्त्र विभाग व वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रा.डॉ.नवनाथ रासकर प्रा.डॉ.ज्योत्स्ना बोराटे प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर प्रा.डॉ.प्रशांत शेटे प्रा.डॉ.सागर निकम यांची उपास्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. दीपक राऊत पवार यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, विद्यार्थीदशेतील मानसिक ताण-तणाव, भावनिक संतुलन, अभ्यासातील ताण, peer support, ताण व्यवस्थापन तसेच योग्य वेळी समुपदेशन घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध मानसिक आरोग्यविषयक समस्या आणि त्यावरील व्यवहार्य उपाययोजना यावेळी डॉ. राऊत यांनी स्पष्ट केल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व मानसशास्त्र आणि वाणिज्य विभागाचे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्येने विद्यार्थी याचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ललित वेळेकर सर प्रास्ताविक व अतिथी परिचय विभागाचे समन्वयक डॉ.नवनाथ रासकर तर आभार बीकॉम भाग एकची विद्यार्थी कु. श्रेया भापकर हिने मानले.


















