फलटण प्रतिनिधी - आज मंगळवार दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी HT/LT लाइन व DTC मेंटेनन्सच्या कामाकरिता 22KV फलटण शहर व 22KV साईनगर वाहिनी सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत वरील फिडर वरील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली. मेंटेनन्सचे काम लवकर झाले तर वेळेअगोदर सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. विज ग्राहकांनी सहकार्य करावे असे शेवटी म्हटले आहे.


















