Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन
टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. १
जिल्हा परिषद, सातारा यांच्यावतीने माझी शाळा आदर्श शाळा या कार्यक्रमांतर्गंत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ठाणे व सातारा जिल्हा शंभूराज देसाई, यांच्या हस्ते सोमवार दि. 02 सप्टेंबर 2024 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात जिल्हा परिषद, सातारा येथे संपन्न होत आहे. 

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील 223 केंद्रशाळांतर्गत प्रत्येकी एक प्रमाणे 223 शाळांची निवड माझी शाळा आदर्श शाळा या कार्यक्रमांतर्गत केली असून सदर शाळांच्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत . या सर्वांना शाळा आदर्श करणेकामी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यशाळेचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये करण्यात येणार असून त्यामध्ये गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक उपस्थित राहून सदर कार्यशाळेचा लाभ घेणार आहेत.

या कार्यशाळेच्या निमित्ताने सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने शासन निर्णयावर आधारित आनंददायी अभ्यासक्रम पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत त्यांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच आनंददायी अभ्यासक्रम या पुस्तिकेचे तसेच शैक्षणिक दिनदर्शिकेचे व शिक्षक मार्गदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सन 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधील जिल्हास्तरावर प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळांचा बक्षीस वितरण समारंभ तसेच सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत सन 2023-24 मध्ये राबविलेले स्वच्छ सुंदर व उपक्रमशिल गुणवत्तापूर्ण शाळा अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातील अनुक्रमे प्रथम तीन क्रमाकांच्या शाळांचा बक्षीस व गौरव समारंभ होणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, उपअभियंता बांधकाम व पाणीपुरवठा, शाखा अभियंता, मनरेगा तांत्रिक अधिकारी व स्वयंरोजगार कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER