कुस्ती ग्रामीण भागातील मातीतला अस्सल खेळ आहे कुस्तीपटू होण्यासाठी अशी संमेलने प्रेरणादायी ठरतील यातूनच भविष्यातील कुस्तीपटू तयार होऊन देशासाठी उज्वल यश संपादन करतील हे कुस्ती संमेलन लाल मातीशी नाळ जोडण्यासाठी प्रेरक ठरेल असे मत रणजित खाशाबा जाधव यांनी आदर्की येथे राष्ट्रीय खलिफा पुरस्कार 2023 च्या वितरण प्रसंगी व्यक्त केले
ओलंपिक वीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर सन्मान त्यांचे चिरंजीव श्री रणजित जाधव यांनी स्वीकारला भारत देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे कोल्हापूर यांचा मरणोत्तर सन्मान श्री रोहित खंचनाळे कोल्हापूर यांनी स्वीकारला तसेच एनआयएस कोच महालिंग खांडेकर म्हसवड व कुस्ती मित्र श्री संपतराव जाधव यांना संमेलन अध्यक्ष दिनकर ताजने गुरुजी यांच्या हस्ते सन्मानपत्र शाहूशेला गौरवचिन्ह ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र कुस्ती संमेलनाचे उद्घाटन लाल मातीचे ऋण जतन करणे तसेच भारत देशाला आरोग्य संपन्न कर्तृत्ववान खेळाडू मिळावेत देशाचे उज्वल भविष्य घडवावे या उद्देशाने कुस्तीगीर मुलं, कुस्तीगीरांच्या माता भगिनींच्या हस्ते आखाड्याचे पूजन करून एक्कावन्न श्रीफळ वाढवुन शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कोल्हापूर येथील खासबाग मैदान शाहू आखाड्याला 111 वर्ष पूर्ण होत आहेत याच्या गौरवार्थ महाराष्ट्रातील 111 कुस्ती आखाडे, तालमितील लाला मातीचे पूजन करण्यात आले .विविध वयोगटातील कुस्तीगिरांनी आपले कुस्ती कौशल्य दाखवून अत्यंत चुरशीने लढती देऊन विजय मिळवला.
याप्रसंगी आरनेश्वर लाल माती आखाडा जामखेड येथील पैलवान गौरी शेळके व वाखरी फलटण येथील कुमारी स्नेहा ढेकळे यांनी महाराष्ट्र कुस्ती संमेलन केसरी 2023 किताब मिळविला. पैलवान प्रज्वल मदने आदर्की यांनी श्री भैरवनाथ केसरी हा किताबाचा मानकरी ठरला .या कार्यक्रमासाठी छत्रपती पुरस्कार विजेते नझरुद्दीन नायकवडी पैलवान, तुकाराम खांडेकर पैलवान दिनेश अंजनाळे हुबळी पैलवान राजेश वेठे पैलवान प्रेम पूर्वी धारवाड ,पैलवान मनोहर आडके , हिंदकेसरी मारुती माने कुस्ती संकुलनचे सुधाकर माने सांगली, शिवानी सोनवणे नाशिक, कैलास जेजुरकर जुन्नर ,वैशाली दहिवडे सोलापूर, मधुकर गिलबिले पुणे ,जयसिंग लोखंडे कोरेगाव ,बापूराव सुळ, सुनिती धायगुडे खंडाळा, सौ मीताबाई ठोंबरे, क्रीडा प्रशिक्षक शुभांगी धसाडे मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी संतोष ठोंबरे, अक्षय ठोंबरे, मल्हारी मदने, बादशाह पठाण ,विश्वास धुमाळ, सलीम पठाण ,मारुती सूळ ,हनुमंत सुळ , भारत सूळ, ज्ञानेश्वर निकम, सचिन किरवे दादा जाधव ,शांताराम पंडित यांचे विशेष सहकार्य लाभले . सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक तसेच हुबळी धारवाड कर्नाटक येथील कुस्तीगीर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुजन फाउंडेशन आदर्की बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले उपस्थित कुस्तीगीर व खेळाडूंना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र मेडल देऊन सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमासाठी आदर्की माध्यमिक विद्यालयाचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र कुस्ती संमेलन प्रसंगी उपस्थित क्रीडाप्रेमींना कुस्तीगीर यांना भारत देशाचा अभिमान असणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांना मिळालेले ऑलिंपिक पदक या ठिकाणी कुस्तीप्रेमींना पाहण्याची संधी मिळाली कुस्तीप्रेमींनी या पदकासमोर नतमस्तक होऊन प्रेरणा घेतली संमेलन प्रसंगी उपस्थित सर्व कुस्तीगीर मुलांना मुलींना दूध पिण्यासाठी स्टीलचे ग्लास देण्यात आले.