Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

परळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी

पुरातन मंदिर अभ्यासक धैर्यशील दयाळ यांची आग्रही मागणी
टीम : धैर्य टाईम्स

सातारा,  : सातारा हा विविध पुरातन वास्तूंनी नटलेला आहे. अजिंक्यतारा, बारा मोटेची विहीर, पाटेश्‍वरचे मंदिर, औंधचे मंदिर, क्षेत्र माहुली येथील मंदिरे, पाटण येथील तलवार विहीर या सारख्या अनेक पुरातन वास्तू सातारा तालुका आणि जिल्ह्यामध्ये आहेत. यामध्येच अजून एक म्हणजे परळी येथील मंदिर, परळी गावाच्या बाहेर हे मंदिर आहे. मंदिराजवळील पटांगणात संध्याकाळी तुम्हाला मुले क्रिकेट किंवा इतर खेळ खेळताना दिसतील. इथे आहे, सातारकरांना लाभलेले एक सुंदर मंदिर.
मंदिर हे शंकराचे आहे. बाहेरून आणि आतून मंदिरात सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाहेर अंगणात एक दीपस्तंभ उभा आहे. यावरही सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाहेर दगडाच्या काही आयताकृती टॅबलेट’ ठेवलेल्या आहेत. यावर विविध प्रकारची चित्रे अहेत. एका टॅबलेटवर वरून ते खाली पर्यंत तीन विभागणी आहेत आणि त्यावर चित्र कोरलेली आहेत. यावर पूजा करतानाचे चित्र, युद्ध सामग्री घेऊन उभे असणार्‍या योद्धानचे चित्र, कामसुत्राचे चित्रे व इतर चित्रे कोरलेली आहेत.
हे कोरीव काम वेळेनुसार झिजून पुसट होत चालले आहे. त्यावर बुरशी, शेवाळ व लायकेनचा थर बसलेला आहे.  मंदिरा जवळील भागात इतर छोटे मंदिरे ही आहेत. पण हे मंदिरे पडलेली आहेत, आणि त्यांचा काही भाग हा झाडाझुडपानमध्ये व जमिनीमध्ये गुडूप झालेला आहे.
मुख्य मंदिर हे परिसरातील सर्व मंदिरांमध्ये मोठे आहे. त्याच्या बाहेर सुंदर नक्षीकाम केलेला एक मोठा नंदी आहे. मंदिराच्या आत ही एक नंदी आहे. मंदिराच्या आतून जर तुम्ही मंदिराच्या छताकडे बघाल, तर तुम्हाला नागाचे फणा असलेल्या आकृती दिसतील. विशेष म्हणजे या सर्व अकृतींमधील नागाचे फणे हे छतावर उलटे आहेत. मंदिराच्या आत खांबांवर विविध आकृती कोरलेल्या आहेत व त्यांवर नक्षीकाम केलेले आहे. या नक्षीकामामध्ये तुम्हाला फुले, पाने, पक्षी आढळतील.
मंदिराच्या गाभार्‍यात पिंड आहे. त्यावर तांब्याची घंटा आहे. गाभार्‍या बाहेरील नंदीच्यावर व गाभार्‍याच्या आतील पिंडीवर, मंदिराच्या लशळश्रळपस/ छतावर एका आयतकृती मध्ये दुसरी आयताकृती - आकारामध्ये मांडलेली दिसेल.
हे संपूर्ण मंदिर हे दगडाचे आहे. मंदिराचा दीपस्तंभ, मंदिरातील नंदी, मंदिराचे खांब, मंदिराची छत, पिंड, सर्व काळ्या दगडांनी बनवलेले आहे. या दगडांवर कोरीव व नक्षीकाम करुन हे मंदिर उभारलेले आहे.
तुम्ही कोणास परळी येथील गावकर्‍याला मंदिर किती जुने आहे असे विचाराल, तर पांडवकालीन आहे ऐकायला भेटेल. मंदिराच्या बाहेर ठेवलेल्या टॅबलेटवर जी  चित्रे कोरलेली आहेत, ती दूरच्या इतर मंदिरांमध्ये ही दिसतील. 
ओडिशाच्या कोणार्क सूर्य मंदिरामध्ये, मध्येप्रदेश येथील खजुराहो येथील मंदिरांमध्येही आकृती आढळतात. महाराष्ट्रा जवळील काही मंदिरांमध्ये असे कोरीवकाम आढळते. या मंदिरांचा एकमेकांशी संबंध असू शकतो, व ते एकाच शतकातील असू शकतात.
परळी येथील मंदिर जपण्याची सातारकरांवर जबाबदारी आहे. सातार्‍यातील इतर पुरातन स्थळे जपण्याची गरज आहे. हा आपल्याला लाभलेला एक वारसा आहे, जो जपला पाहिजे.
या पुरातन स्थळांकडे पुरातत्व विभागाने लक्ष दिले पाहिज व यांची दुरुस्ती व जपवणूक योग्य त्या विज्ञानाच्या शास्त्रीय पद्धतींनी केली पाहिजे, असे मत धैर्यशील दयाळ यांनी व्यक्त केले आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER