फलटण प्रतिनिधी :
फलटण येथील नगर परिषदेचे कर्मचारी मुकेश विनायक अहिवळे व स्वरूप संजय अहिवळे यांची अनुक्रमे कराड व मेढा येथे स्वच्छता निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
मुकेश विनायक अहिवळे व स्वरूप संजय अहिवळे हे फलटण नगर परिषद फलटण येथे कार्यरत होते. या दोघांच्या स्वच्छता निरीक्षक या पदी निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.