'जय भीम' हा नारा कुणी दिला? 'जय भीम' म्हणण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली? 'जय भीम' हा चित्रपट कोणत्या सत्यघटनेवर आधारित आहे? त्या कथेचा खरा नायक कोण
गेल्या महिन्यात रीलिज झालेल्या 'जय भीम' या तामिळ सिनेमाला IMDb वेबसाईटवर युजर्सनी सर्वोत्तम चित्रपट म्हणून रेटिंग दिलंय.
'द शॉशँक रिडम्पश्न' आणि 'द गॉडफादर' यासारख्या क्लासिक सिनेमांना मागे टाकत 'जय भीम' आता IMDb वरचा पहिल्या क्रमांकाचा सिनेमा झाला.
'जय भीम' सिनेमाच्या सुरुवातीलाच एक दृश्य आहे. संशयितांच्या एका गटातून पोलिस लोकांना त्यांच्या जातीच्या आधारे वेगळं काढतायत. वरच्या जातीच्या लोकांना जायला सांगण्यात येतं तर दलित किंवा आदिवासी समाजातल्या लोकांना थांबवून ठेवलं जातं. यानंतर पोलिस या दुसऱ्या गटातल्या लोकांवर काही खोटे गुन्हे दाखल करतात.जय भीममधील कथित जातीयवादी बदनामीप्रकरणी सूर्याकडे 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी
'जय भीम' हा नारा कुणी दिला? 'जय भीम' म्हणण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली?
'जय भीम' हा चित्रपट कोणत्या सत्यघटनेवर आधारित आहे? त्या कथेचा खरा नायक कोण?
घाबरलेले हे लोक एका कोपऱ्यात उभे आहेत...कदाचित त्यांच्यासोबत काय होणार आहे याचीही त्यांना कल्पना आहे. आपल्या आजुबाजूला अशा घटना वारंवार घडतात आणि समाजातल्या वंचितांच्या विशेषतः लहान गावा-शहरांतल्या दलितांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो, हेच यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होतं.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के दलित आहेत. आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे असूनही त्यांना भेदभाव आणि हिंसाचार सोसावा लागतो.
टी. जे. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या 'जय भीम' सिनेमात तामिळ स्टार सूर्याची प्रमुख भूमिका आहे. पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झालेल्या आणि नंतर फरार घोषित केलेल्या माणसाच्या गरोदर पत्नीची केस लढवणाऱ्या वकिलाची भूमिका सूर्याने वठवली आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या कहाण्या दाखवणाऱ्या तरूण दिग्दर्शकांच्या सिनेमांमधला 'जय भीम' हा एक नवीन अध्याय आहे. सिने इतिहासकार एस. थिओडोर भास्करन सांगतात, " 1991 मध्ये आंबेडकरांची जन्मशताब्दी झाली. तेव्हापासून गेल्या 30 वर्षांमध्ये तामिळनाडूमध्ये दलित चळवळ वाढतेय. 20 व्या शतकातले विस्मृतीत गेलेले दलित विचारवंत लोकांना पुन्हा आठवले. पेरियार आणि आंबेडकरांसारख्या सामाजिक कार्यकर्ते आणि राजकाऱ्यांचे विचार अनेक दलित लेखकांमार्फत पसरले.
गेल्या दशकात यातले काही लेखक सिनेमाकडे वळले आणि त्यांनी सिनेमे तयार केले. पण त्यांनी गाणी, मारामारी आणि रडारड अशा नेहमीच्या गोष्टी वापरल्या होत्या."
आता भारतामध्ये प्रादेशिक भाषांमध्ये तयार होणाऱ्या सिनेमांमध्येही दलित कथानकाला स्थान मिळतंय. पंजाबी भाषेतल्या 'अन्हे गोऱ्हे दा दान' या सिनेमात शीख दलितांच्या आयुष्याचं चित्रण आहे, तर 'मसान' या हिंदी सिनेमात वरच्या जातीची मुलगी आणि स्मशानात काम करणाऱ्या कुटुंबातला मुलगा यांच्या प्रेमकहाणीचं चित्रण आहे.
मराठीतल्या 'फँड्री' आणि 'सैराट' या दोन्ही सिनेमांचं दिग्दर्शन स्वतः दलित असणाऱ्या नागराज मंजुळे यांनी केलंय.
'फँड्री' गोष्ट आहे गावातली डुकरं पकडण्याचं काम करणाऱ्या एका कुटुंबातला तरूण मुलगा आणि त्याचं जिच्यावर प्रेम आहे त्या मुलीची.
अशीच आंतरजातीय प्रेमकहाणी दाखवणाऱ्या 'सैराट'मधली गाणी तर प्रचंड लोकप्रिय झालीच पण बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने मोठं यश मिळवलं. 2022मध्ये भारताने ऑस्करला पाठवेला पेबल्स या तामिळ सिनेमाही यासारखाच.
पण आता तामिळ सिनेमात आलेले नवीन फिल्ममेकर्स मुख्य प्रवाहातले सिनेमे करताना त्यातली प्रमुख पात्रं दलित दाखवत आहेत. ही पात्रं गेल्या अनेक काळापासूनचा भेदभाव मोडून काढत आपल्या हक्कांसाठी लढा देतात आणि जेव्हा कायदेशीर मार्गाने न्याय मिळत नाही तेव्हा प्रत्यक्ष मारामारी करण्याचीही त्यांची तयारी असते.
ज्येष्ठ दिग्दर्शक वेत्रीमारन यांचाही अशा दिग्दर्शकांत समावेश आहे. 2015मध्ये आलेल्या त्यांच्या 'विसारनई' या सिनेमामध्ये आंध्र प्रदेशातल्या तामिळ स्थलांतरितांच्या अवस्थेचं चित्रण होतं तर 'असुरन' हा सिनेमा दलित हत्याकांडावर आधारित होता.
तिशीतल्या मारी सेल्वराज आणि पा रणजीत या दोन महत्त्वाच्या दिग्दर्शकांनी दलित तरुणांना मध्यवर्ती भूमिकेत ठेवत कथानकं उभी केली.
दलित सिने निर्माते रणजीत यांना अनेकदा तामिळ फिल्म इंडस्ट्रीचे स्पाई ली म्हटलं जातं. 2020मध्ये 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आधीच्या तामिळ सिनेमांचा दाखल देत त्यांनी म्हटलं होतं, "सिनेमांमधलं दलित पात्राचं चित्रण त्रासदायक होतं. एकतर ही पात्रं संपवली जायची किंवा गोष्टीमध्ये त्यांचा फक्त समावेश करणंही क्रांतीकारी मानलं जाई."
रणजीत यांचा सरपत्ता परमबराई हा जवळपास तीन तासांचा आहे. चेन्नईतल्या दलितांमधल्या बॉक्सिंगच्या आवडीविषयी हा सिनेमा आहे.
"हे पाहता माझ्या कथा काय सांगू शकतात याचा विचार मी केला. आपली संस्कृतीच भेदभाव आणि हिंसेवर आधारीत असल्याचं मला दाखवायचं होतं...आज दलित पात्रं लिहिताना दिग्दर्शक अधिक विचार करतात."
मारी सेल्वराज यांनी दिग्दर्शित केलेला 'पेरीयेरुम पेरुमल' या सिनेमाची रणजीत यांनी निर्मिती केली. या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक पाटी दिसते - 'जात आणि धर्म हे मानवतेच्या विरोधात आहेत' या फिल्ममधल्या मुख्य पात्राला आंबेडकरांसारखं वकील व्हायचं असतं.
'पेरीयेरुम पेरुमल' सिनेमाच्या मध्याच्या सुमारास काही पुरुष 1983मधल्या 'पोरादादा' या गाण्यावर नाचताना दिसतात.
प्रसिद्ध संगीतकार आणि स्वतः दलित असणाऱ्या इलायाराजा यांनी या गीताला संगीत दिलं होतं. या गाण्याचे शब्द म्हणतात, "आम्ही तुमचं सिंहासन बळकावू...आमचा विजयोत्सव सगळ्यांना ऐकू जाईल आणि त्याचा उजेड जगभर पसरेल..उपेक्षित समाज लढा देईल."
सेल्वराज यांच्या कर्णन या 2021च्या सिनेमातही हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत होतं. या गाण्याला आता 'दलित अँथम' म्हटलं जातंय.
रणजीत यांच्या सिनेमांना प्रोत्साहन मिळालं तामिळ सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडून. रजनीकांत यांना पटकथा ऐकवल्यानंतर इतकी आवडली की ते 'कबाली' आणि 'काला' सिनेमात मुख्य भूमिका करण्यासाठी तयार झाले.
फोटो स्रोत, WUNDERBAR FILMS
रणजीत यांचा 'सरपट्टा परमबराई' हा जवळपास तीन तासांचा आहे. चेन्नईतल्या दलितांमधल्या बॉक्सिंगच्या आवडीविषयी हा सिनेमा आहे. बॉक्सर महंमद अली आणि त्यांनी व्हिएतनाम युद्ध आणि अमेरिकेतल्या वंशभेदाविषयी घेतलेल्या भूमिकेवरून प्रेरणा घेत हा सिनेमा तयार करण्यात आला.
तामिळ सिनेमांतल्या दलित पात्रांचं वाजवीपेक्षा जास्त कौतुक होत असल्याचं काहींना वाटतंय. 2019मध्ये आलेल्या मादथी : अॅन अनफेअरी टेल या सिनेमाचं दिग्दर्शन लीना मणीमेकलाई यांनी केलं होतं. यामध्ये उपेक्षित दलित समाजातल्या तरुण महिलेची व्यथित करणारी कथा होती.
लीना मणीमेकलाई सांगतात, "अजूनही सिनेमांत तोच हिरो, पुरुषार्थ असतो. सगळं भव्यदिव्य असतं. महिलांची पात्रं ही फक्त तोंडी लावण्यापुरती किंवा त्यांचे नवरे किंवा प्रेमींच्या चीअरलीडर्ससारखी असतात आणि या सिनेमांतले उपेक्षित समाज कुऱ्हाड, बंदूक आणि कोयता घेऊन त्यांना पिढ्यानपिढ्याच्या अन्यायापासून वाचवायला येणाऱ्या हिरोच्या प्रतीक्षेत असतात."
पण प्रेक्षक नवीन धाटणीचा सिनेमा पाहतात हे आता स्पष्ट झालंय. 'जय भीम' थिएटर्समध्ये प्रसिद्ध झालेला नसल्याने त्याची लोकप्रियता दर्शवणारी बॉक्स ऑफिस कामगिरीची आकडेवारी उपलब्ध नाही. पण प्रेक्षकांनी IMDbवर दिलेलं 9.6 रेटिंग या सिनेमाला पहिल्या क्रमांकाचं स्थान देऊन गेलंय.