सातारा दि.23: सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना सन 2021 - 2022 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या एक-एक पाल्यांची निवड एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. तरी पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज दि. 22 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.